कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील सरपंचांना विम्याचे संरक्षण देण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र, त्याबाबतचा निर्णय अद्याप होऊ शकला नाही. त्यावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी सामंत याचा समाचार घेतला आहे. पिक्चरचा डायलॉग मारतात, तसा डायलॉग मारला, तर लोक टाळ्या वाजवतील, असं पालकमंत्री उदय सामंत यांना वाटतंय. पण, हा पिक्चर नाही तर ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही आमच्या आयुष्याशी खेळत आहात. सरपंचांना संरक्षण देणार नसेल तर भारतीय जनता पक्ष माध्यमातून सरकारपर्यंत आवाज पोचवेन, असेही राणे या वेळी म्हणाले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics